शेअर बाजारात खळबळ, सोन्याचे दर काय? वाचा आजचा 24 कॅरेट सोन्याचा भाव
Gold Price Today: सोन्याच्या दरात सातत्याने होणारी घसरण आता मात्र थांबली आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
Gold Price Today: शेअर बाजारात आज मोठी उलथापालथ झाल्यानंतर कमोडिटी बाजारातही थोडी नरमाई दिसून येत आहे. सोन्याचे दर भारतीय वायदे बाजारात कोसळले होते. तर, चांदीच्या दरातही घट झाली आहे. सोनं MCXवर कोसळल्यानंतर आज पुन्हा भाव वधारले आहेत. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 70,580 रुपये इतके आहे. मागील व्यवहारात सोनं 70 हजार 310 वर स्थिरावले होते. तर आज सोनं 270 रुपयांनी वाढलं आहे. या दरम्यान चांदीही 77 रुपयांच्या आसपास घसरली आहे. आज चांदीची किंमत 80,466 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. तर, शुक्रवारी चांदी 80,543 रुपयांवर व्यवहार बंद झाला होता.
सराफा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक ज्वेलर्सकडून करण्यात येत असलेली मागणी आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत कल यामुळं सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉलर आणि वाढते रोखे उत्पन्न यामुळंही सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
गुडरिटर्नने दिलेल्या माहितीनुसार, आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 250 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा 64,700 रुपये आहे. तर, 24 कॅरेट सोन्याच्या दरात 270 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा 70,580 रुपये झाले आहे.
असा आहे सोन्याचे दर
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 64, 700 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 70, 580 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 52, 940 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 6, 470 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 058 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 294 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 51, 760 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 56, 464 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 42, 352 रुपये
मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 64, 700 रुपये
24 कॅरेट- 70, 580 रुपये
18 कॅरेट- 52, 940 रुपये