Gold Price Today: कमोडिटी बाजारात आज पुन्हा एकदा नरमाई दिसून आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, आज ग्राहकांना मात्र थोडा दिलासा मिळाला आहे. श्रावण महिन्यात सणासुदींना सुरुवात होते. अशावेळी सोनं खरेदी करण्याचा विचार तुम्हीदेखील करत आहात का? तर आजची संधी चांगली आहे. भारतीय वायदे बाजारात सोन्याच्या किंमती उतरल्या आहेत. आज किती आहेत सोन्याचे भाव जाणून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज मल्टी कमोडिटी एक्सजेंचवर सोनं 110 रुपयांनी घसरलं आहे. आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोनं 71,510 रुपये इतकं झालं आहे. तर, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 100 रुपयांनी कमी झाली आहे. आज 22 कॅरेट प्रतितोळ्याची किंमत 65,550 रुपये इतकी झाली आहे.  तर चांदीचे भाव मात्र आज वाढले आहेत. चांदी 193 रुपयांनी वाढली असून आज 81,242 रुपयांवर स्थिरावली आहे. काल चांदीचा भाव 81,049 रुपयांवर व्यवहार बंद झाला होता. 


असा आहे सोन्याचे दर


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  65, 550  रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  71, 510 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  53, 630  रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6, 555 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 151 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 363 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   52, 440 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   57, 208 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    42, 904 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट- 65, 550  रुपये
24 कॅरेट- 71, 510 रुपये
18 कॅरेट- 53, 630  रुपये