Gold Price Today 16th May 2023: गेल्या काही दिवसांच्या घसरणीनंतर आता सोन्याचे दर (Gold Price Hike Today) वाढले आहे. सध्या लग्नसराईचा मोहोल सुरू आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये या महिन्याच्या अखेरीस अथवा जूनच्या सुरूवातीला लग्नाचे मुहूर्त असतील तेव्हा सगळीकडेच सध्या सोनं खरेदी सुरू असेलच. त्यातून आता सोन्याच्या दरात वाढ झाल्यानं ग्राहकांना अधिकीचे पैसे मोजावे लागणार आहेत. सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासूनच निरिक्षण आहे की, सोन्याच्या दरात बरीच मोठी चढउतार होताना दिसते आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे सोन्याच्या भाव हे काही शे रूपयांनी घसरत आहेत अथवा वाढत आहेत. परंतु सोनं मात्र अद्यापही 60 हजाराच्या पारच आहे. फेब्रुवारी महिन्यात सोन्याचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याच काळात सोन्याच्या दरानं 60 हजार रूपयांचा (Gold Price Today Prediction) पल्ला गाठला होता. (gold price today 16th may 2023 check the latest price in mumbai pune nashik nagpur)


आता सोन्याचे दर हे पुन्हा एकदा वाढले आहे. गुडरिटर्न्स या वेबसाईटनुसार, शुद्ध सोन्याचे दर हे आज 110 रूपयांनी वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासूनचे निरिक्षण असे की, सोन्याचे दर हे घसरत होते. त्यातून काही दिवसांपुर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ होत दुसऱ्या दिवशी मोठी घसरणही झाली होती. सोन्यांकडे ग्राहक हे गुंतवणूक या अर्थानंही पाहतात त्यातून आता या सोन्याच्या दरात सतत घसरण नाहीतर वाढ होते आहे. आजचे सोन्याचे दर हे 60 हजार पारच आहेत. आज 22 कॅरेट सोनं हे 57,750 रूपये प्रति 10 ग्रॅम इतके असून 24 कॅरेट सोनं हे 61,910 रूपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज 22K सोनं हे 100 रूपयांनी वाढले आहे. 


किती पैसे मोजावे लागणार?


गुडरिटर्न्सनुसार, 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना 5675 रूपये तर 8 ग्रॅम 22 कॅरेट सोन्यासाठी 45,400 रूपये मोजावे लागणार आहेत. तर 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्यासाठी 5,67,500 रूपये मोजावे लागणार आहेत. तर शुद्ध सोन्यासाठी ग्राहकांना 1 ग्रॅम सोन्यासाठी 6191 रूपये आणि 8 ग्रॅम सोन्यासाठी 49,538 रूपये मोजावे लागणार आहेत. 100 ग्रॅम शुद्ध सोन्यासाठी 6,18,000 रूपये ग्राहकांना मोजावे लागणार आहे. 


हेही वाचा - प्राजक्ता गायकवाडनं घेतलं नवं घर, सत्यनारायणाच्या पूजेचा Video केला शेअर; नेटकरी म्हणाले...


तुमच्या शहरातील दर पाहा


नागपूरमध्ये शुद्ध सोनं 10 ग्रॅमसाठी 61,910 रूपये इतके आहे तर 22 कॅरेट सोनं हे 56,750 रूपये प्रति 10 ग्रॅम आहे. नाशिकमध्ये शुद्ध सोन्याचे दर हे नागपूर शहराऐवढेच आहेत परंतु 22 कॅरेट सोन्यासाठी नाशिककरांना 56,780 रूपये प्रति 10 ग्रॅम सोनं मोजावं लागणार आहे. पुण्यात 24K सोनं हे 61,910 प्रति 10 ग्रॅम रूपये एवढे आहे. तर 22K सोनं हे 56,750 रूपये प्रति 10 ग्रॅम एवढे आहे.