Gold Rate | सोन्याच्या दरात रेकॉर्डब्रेक तेजी; चांदीची चकाकीही वाढली
Gold Silver Price Today: लग्नसराईचा हंगाम सुरू होताच सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आजही मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या दरात तेजी आहे.
मुंबई : Gold Silver Price Today: सध्या लग्नसराईचे सिजन सुरू झाला आहे. यामुळे भारतीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने, सोन्याची नव्या विक्रमाकडे वाटचाल सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सकाळी सोन्याचा फ्युचर्स भाव 0.65 टक्क्यांनी वाढून 53,332 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ दिसून येत आहे. चांदीचा भाव 69,761 रुपये प्रति किलोवर आहे.
सोन्या चांदीच्या दरात वाढ
जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. जागतिक बाजारपेठेत किमतीत वाढ झाल्यामुळे भारतीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. सोमवारी म्हणजेच आज सकाळी सोन्याने एका महिन्याचा उच्चांक गाठला. त्याचवेळी चांदीच्या दरातही 1 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.
मुंबईतील 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर 55100 रुपये प्रति तोळे
मुंबईतील चांदीचे आजचे दर 71100 रुपये प्रति किलो.
जागतिक बाजारपेठेत तेजी
वास्तविक रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम शेअर बाजारापासून चौफेर दिसून येत आहे. यावेळी गुंतवणूकदारही घाबरले असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळत आहेत. त्यामुळेच जागतिक बाजारातही सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे.
तज्ञ काय म्हणतात?
वाढती महागाई आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ होऊ शकते. जगातील अनेक मोठ्या देशांमध्ये महागाई शिगेला पोहोचली आहे. यूएसमधील किरकोळ चलनवाढ सध्या 40 वर्षांच्या उच्चांकावर आहे आणि वाढत्या व्याजदरामुळे सोन्याच्या किंमतीतही आणखी वाढ अपेक्षित आहे. जागतिक बाजारात किंमत वाढली तर त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर दिसून येईल.