मुंबई : मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर MCX वर सोन्याचा ओक्टोबरचा कॉन्ट्रॅक्ट घसरणीसह सुरू झाला होता. सोमवारी ग्लोबल मार्केटमध्ये सोने चांदीच्या दरांमध्ये घसरण दिसून आली. तसेच डॉलर मजबूत होत असल्याने MCXमध्ये देखील सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर ऑक्टोबरच्या कॉन्ट्रॅक्टचे सोने (Gold)चा भाव 0.13 टक्क्यांनी घसरला. तसेच डिसेंबरमध्ये चांदीची किंमत 1 टक्क्यांनी घससली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

MCX वर सोन्याचा आजचा दर दुपारी 2 वाजेपर्यंत  46,020 रुपये प्रतितोळे इतका होते. तर चांदीचे दर 60082 रुपये प्रतिकिलो होते. 


मुंबईतील सोन्याचा दर
22  कॅरेट 45,130 रुपये प्रति तोळे
24 कॅरेट 46,130 रुपये प्रति तोळे


मुंबईतील चांदीचे आजचे दर 60,000 रुपये प्रति किलो इतके होते.


जाणकारांचे मत
तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतीत आणखी घट होऊ शकते. देशातील बाजारात सध्याचे दर सहा महिन्यांच्या निच्चांकावर पोहचले आहेत. मागील वर्षी ऑगस्टमध्ये सोने 56200 रुपये प्रति 10 ग्रॅमचा उच्चांकीवर पोहचले होते. 


कोटक सेक्युरिटीजने म्हटले आहे की, अमेरिकी डॉलर आणि इक्विटी बाजारांच्या निकालांमुळे सोन्याच्या सध्याच्या स्थितीत बदल होऊ शकतो. गुंतवणूकदार युएस फेडच्या मॉनिटरी पॉलिसीबाबत आणि चीनच्या आर्थिक स्थितीचे आकलन करीत आहेत.