उच्चांकी दरवाढीनंतर आज सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा 18,22,24 कॅरेटचा दर
Gold Price Today: आज सोनं-चांदीच्या दरात घट झाल्याचे समोर आलं आहे. पाहा काय आहे आजचा दर
Gold Price Today: काल सोनं तब्बल 500 रुपयांनी महागलं होतं. तर आज मात्र कमोडिटी बाजारात सोन्याच्या दरात नरमाई झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर, सराफा बाजारातही सोनं स्वस्त झाल्याचे दिसत आहे. भारतीय वायदे बाजारात आज सोनं 330 रुपयांनी घसरले आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळे 72,870 रुपये इतका आहे. तर चांदीच्या दरात आज 213 रुपयांची घसरण झाली असून 84,650 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहार करत आहे. काल चांदी 84,863 रुपयांवर बंद झाली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं उच्चांकी पातळीवर आहे. स्पॉट गोल्ड 0.1 टक्क्यांनी वाढून 2,516 डॉलरच्या आसपास व्यवहार करत आहे. यापूर्वी 2,531 डॉलरच्या रेकॉर्डवर हाय करत आहे. यूएस गोल्ड फ्युचर्स 0.1 टक्क्यांनी वाढून 2,547 डॉलरवर व्यवहार करत आहे. आज भारतात 22 कॅरेट सोनं 66,800 रुपयांवर स्थिरावलं असून 300 रुपयांची घट झाली आहे. तर एक ग्रॅम सोनं आज 6,680 रुपयांवर पोहोचले आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 66,800 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 72,870 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 54,660 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 6, 680 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 287 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 466 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 53, 440 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 58, 296 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 43, 728 रुपये
मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 66,800 रुपये
24 कॅरेट- 72,870 रुपये
18 कॅरेट- 54, 660 रुपये