Gold Price Today: सोने आज पुन्हा झाले स्वस्त, पाहा 10 ग्रॅमचा काय आहे दर?
Gold price today : Gold - Silver Rate Update सराफा बाजारात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे.
मुंबई : Gold price today : Gold - Silver Rate Update सराफा बाजारात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे. सोने दरात आज घरसण दिसून आली आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी आजचा दिवस चांगला आहे. MCXवर सोन्याचे जून वायद्यात घसरण पाहायला मिळत आहे. व्यापार अगदी मर्यादित श्रेणीत होत आहे. परंतु चांदीची घसरण आजही कायम आहे, MCXवरील चांदीचा वायदा 500 रुपयांनी खाली आला आहे. काल चांदीचा वायदा दरात किलोमागे 1000 रुपयांनी घसरण झाली. चांदीच्या किंमती तीन दिवसांत 1,400 रुपयांनी खाली आल्या आहेत.
MCX Gold:आज एमसीएक्सवर सोन्याचे जून वायदे सुरू झाले आहेत. सध्या 130 रुपयांच्या घसरणीनंतर सोने किंमत 44300 च्या आसपास आहे. काल MCXवरील सोन्याचे वायदे 300 रुपयांनी मजबूत होत बंद झाले. सोमवारी सोमवारी सोन्याचे MCX व्यापार 44,000 च्या खाली गेले. यावेळी, सोन्याने इंट्राडेच्या किमान पातळी प्रति 10 ग्रॅम 43320 रुपयापर्यत खाली आले. मागील आठवड्याकडे नजर टाकल्यास गेल्या आठवड्यात सोमवारी सोने दर प्रति 10 ग्रॅम 44905 रुपये होता, तेव्हापासून सोने 600 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
मागील आठवड्यात सोने दर
दिवस सोने (MCX अप्रैल वायदा)
सोमवार 44905/10 ग्रॅम
मंगळवार 44646/10 ग्रॅम
बुधवार 44860/10 ग्रॅम
गुरुवार 44695/10 ग्रॅम
शुक्रवार 44642/10 ग्रॅम
सोने किंमती उच्च पातळीवरून 11900 रुपयांनी स्वस्त
मागील वर्षी, कोरोना संकटामुळे लोकांनी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती, ऑगस्ट 2020 मध्ये, एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56191 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली. मागील वर्षी सोने खरेदीनंतर 43 टक्के परतावा मिळाला. उच्च पातळीच्या तुलनेत सोन्याचे दर 25 टक्क्यांनी घसरले आहेत, सोने दर 10 ग्रॅम 443०० रुपयांच्या पातळीवर एमसीएक्सवर व्यवहार होत आहेत, म्हणजेच ते साधारण 11900 रुपयांनी स्वस्त होत आहे.
MCX Silver : आज चांदीमध्ये खरेदीची संधी आहे. काल चांदीचा भाव MCXवर 1000 रुपये प्रतिकिलोवर बंद झाला होता, आज तो 300 रुपयांनी खाली आला आहे. सोमवारी होळीच्या दिवशी चांदीचे दर प्रति किलो 646 रुपयांनी कमी झाले. आज MCXवरील चांदीचा वायदा दर 300 रुपयांच्या कमजोरीसह 62600 रुपये प्रतिकिलोवर व्यापार करीत आहे. गेल्या आठवड्यात सोमवारी चांदी 66331 रुपये प्रतिकिलो होती, आठवड्यात चांदीची किंमत 3700 रुपयांपेक्षा जास्त आहे.
मागील आठवड्यात चांदीचा दर
दिवस चांदी (MCX - मे वायदा)
सोमवार 66331/किलो
मंगळवार 64972/किलो
बुधवार 65245/किलो
गुरुवार 64869/किलो
शुक्रवार 64174/किलो
चांदी 17300 रुपये स्वस्त
चांदीची उच्च पातळी प्रति किलो 79,980 रुपये आहे. यानुसार चांदी देखील उच्च पातळीपेक्षा 17380 रुपयांनी स्वस्त झाली आहे. आज चांदीचा वायदा भाव प्रतिकिलो 62600 रुपयांवर आहे.
सराफा बाजारात सोने-चांदी
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन अर्थात आयबीजेएच्या म्हणण्यानुसार काल सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. मंगळवारी सोन्याच्या दर 10 ग्रॅम 44395 रुपयांच्या दराने विक्री झाली, तर पहिल्या शुक्रवारी हा दर 44655 रुपये होता. चांदीच्या किमतींमध्येही मोठी घसरण दिसून आली. सराफा बाजारात चांदीचा भाव प्रति किलो 63713 रुपये झाला, तर शुक्रवारी चांदीचा भाव 64658 रुपये प्रतिकिलो होता.