सणासुदीच्या दिवसांत दागिने खरेदी करणे महागणार; आज पुन्हा सोन्याचे भाव वाढले, 24 कॅरेटचे भाव जाणून घ्या
Gold Price Today: सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. आज सोन्याच्या दरात घसरण झाली की वाढ जाणून घेउया
Gold Price Today: कमोडिटी बाजारात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. सराफा बाजारात सणासुदीच्या दिवसांत मौल्यवान धातुच्या दरात वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जियो पॉलिटिकल टेन्शनमुळं डॉलर मजबूत झाला आहे. याचाच परिणाम कॉमेक्सवर गोल्ड आणि सिल्वरच्या किंमतींवर होताना दिसत आहे. त्यामुळं ऐन सणासुदीच्या काळात सोनं-चांदी महागले आहेत.
शुक्रवारी 4 ऑक्टोबर रोजी वायदे बाजारात मौल्यवान धातुच्या दरात वाढ झाली आहे. आज सकाळी MCXवर सोन्याचे भाव 110 रुपयांनी वाढले आहेत. तर चांदी 265 रुपयांनी वाढून 93,243 रुपये प्रतिकिलोग्रॅमवर स्थिरावली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं किंचित वाढलं असून 2675 डॉलरच्या आसपास स्थिरावला आहे. तर चांदी एक टक्क्याने वाढून 32 डॉलरच्यावर पोहोचली आहे.
व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नवरात्रीच्या सुरुवातीचाच सोन्याची मागणी वाढली आहे. या दिवसांत सोनं खरेदी करणे शुभ मानलं जातं. तसंच, येत्या काही काळात सणांना सुरुवात होणार आहे. तसंच, भारतीय रुपया घसरत असल्यानेही सराफा बाजारात सोन्याचे भाव घसरत आहेत. आज 24 कॅरेट सोन्याचे दर 110 रुपयांनी वाढून 77,560 रुपयांवर स्थिरावले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 100 रुपयांनी वाढून 71,200 रुपयांवर स्थिरावले आहेत. 18 कॅरेट सोन्याचे दर 80 रुपयांनी वाढून 58,170 रुपयांनी स्थिरावले आहेत.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 71,200 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 77,670 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 58,260 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,120 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 767 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 826 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 56,960 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 62, 136 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 46,608 रुपये
मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 71,200 रुपये
24 कॅरेट- 77,670 रुपये
18 कॅरेट- 58,260 रुपये