मुंबई : सराफा बाजारात सोने दरात (Gold Price ) सातत्याने घसरण होताना दिसून येत आहे. गेल्या दहा महिन्यांत सोने दराचा निच्चांक दिसून येत आहे. ( Gold Price Today 6th March) सोन्याची किंमत आज 6 मार्च रोजी कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याची (Gold ) झळाली सातत्याने कमी होताना दिसत आहे. सोने 44 हजार रुपये प्रति तोळा 10 ग्रॅमच्या खाली आले आहे. दरम्यान, सराफा बाजारात सध्या सोने दरात घसरण होत असल्याने सोने खरेदीला लोकांची पसंती दिसून येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. सोने खरेदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सोने आणि चांदीच्या किमतीत सातत्याने घसरत होत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमजोर स्थिती दिसून येत आहे. यामुळे  दिल्ली आणि मुंबई सराफा बाजारात सोने-चांदी याच्या किंमती कमी झाल्या आहेत. गुंतवणूकदारांच्या म्हणण्यानुसार सोने विकत घेण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. कारण बहुतेक वेळा असे पाहिले गेले आहे की लग्नाचा हंगाम सुरू होताच सोने-चांदीच्या किंमती वाढतात.


आणि सोने भाव गडगडले


शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या व्यापारा दिवशी सोने दर दहा ग्रॅम 43,887 रुपयांवर आला. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी शुक्रवार, 26 फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर 10 ग्रॅम 44,409 रुपयांवर बंद झाले. त्यानंतर, पुढच्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत एकूण 522 रुपयांची घसरण झाली. गेल्या काही दिवसांपासून सोने किंमतीत सातत्याने घसरत होत आहेत.


सोने 12,000 रुपयांनी स्वस्त 


मागील वर्षी, कोरोनाच्या संकटामुळे लोकांनी सोने खरेदीवर भर दिला. तसेच यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. ऑगस्ट 2020 मध्ये, एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56191 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली. गेल्यावर्षी सोन्याने 43 टक्के परतावा दिला होता. सर्वोच्च पातळीशी तुलना केल्यास सोन्याने 25 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2020 च्या तुलनेत सोने किंमतीत प्रति 10 ग्रॅम 12,300 रुपयांनी घट झाली आहे.


चांदीच्या भावातही घसरण


सोनेसह, चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. शुक्रवारी चांदीच्या भावात मोठी घसरण नोंदली गेली. शुक्रवारी सकाळी चांदीचा दर प्रति किलो, 66,622 होता, परंतु दिवसअखेर चांदी कमकुवत झाली. चांदी 1,822 रुपयांनी घसरून 64,805 रुपये प्रतिकिलोवर आली. 1 फेब्रुवारी रोजी एमसीएक्सवरील चांदीचा वायदा बजेटच्या दिवशी वाढून 74400 रुपयांवर गेला. चांदीचा उच्च दर प्रति किलो 79,980 रुपये आहे. चांदीदेखील उच्च पातळीवरून सुमारे 15,105 रुपयांनी स्वस्त झाली आहे.