सोनं हे आजही तितकेच महत्त्वाचे मानले जाते. सोन्याला प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनन्य साधारण महत्त्वाच आहे. सोने खरेदी करुन आणि परिधान करुन आनंदोत्सव किंवा एखादा सणसमारंभ साजरा केला जातो. पण सोन्याची मागणी वाढली की, सोन्याच्या दरातही वाढ होते. पण आजचा दिवस वेगळा आहे. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोने पुन्हा स्वस्त झाले आहे. शुक्रवारी, 29 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण दिसून आली. आतापर्यंतचे दर पाहिले तर सोने आतापर्यंत 4 हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, आज 24 कॅरेट ते 18 कॅरेटपर्यंतच्या सोन्याच्या किमती अशा आहेत.


24 कॅरेट सोन्याची किंमत 75916 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
23 कॅरेट सोन्याची किंमत 75612 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
22 कॅरेट सोन्याची किंमत 69539 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
18 कॅरेट सोन्याची किंमत 44411 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचा भाव 87197 रुपये प्रति किलो


सोन्याची फ्युचर्स किंमत


कमकुवत स्पॉट मागणीमुळे सोन्याच्या भावात घसरण झाली, वायदा व्यवहारात सोन्याचा भाव 141 रुपयांनी घसरून 76,375 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. MCX मध्ये, डिसेंबर महिन्यात डिलिव्हरीसाठी कराराची किंमत 141 रुपये किंवा 0.18 टक्क्यांनी घसरून 76,375 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. यामध्ये 11,730 लॉटचे व्यवहार झाले. बाजार विश्लेषकांनी सांगितले की, जागतिक बाजारातील कमजोर कलांमुळे सोन्याच्या फ्युचर्सच्या किमती घसरल्या.


चांदीची किंमत


कमकुवत स्पॉट मागणीमुळे व्यापाऱ्यांनी त्यांच्या सौद्यांचा आकार कमी केल्याने शुक्रवारी वायदा व्यवहारात चांदीचा भाव 656 रुपयांनी घसरून 87,024 रुपये प्रति किलो झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर डिसेंबरमध्ये डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 656 रुपये किंवा 0.75 टक्क्यांनी घसरून 87,024 रुपये प्रति किलो झाला. यामध्ये 9,771 लॉटचे व्यवहार झाले. बाजार विश्लेषकांनी सांगितले की, जागतिक स्तरावर व्यापाऱ्यांनी केलेल्या विक्रीमुळे चांदीच्या भावात घसरण झाली, न्यूयॉर्कमध्ये चांदीचा भाव 0.72 टक्क्यांनी घसरून $29.88 प्रति औंस झाला.