Gold Price Today : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी  (Navratri 2022) सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.  (Gold-Silver Price) आज सोने किंमत 50,000 च्या खाली आली आहे. त्यामुळे तुम्ही नवरात्रीत स्वस्तात सोने खरेदी करु शकता. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तुमच्या शहरातील सोने दर जाणून घ्या. 


सोने-चांदी स्वस्त 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोने-चांदी स्वस्त झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 0.03 टक्क्यांनी घसरुन 49388 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे. त्याचवेळी, जर आपण चांदीच्या किंमतीबद्दल बोललो तर त्यातही घसरण दिसून आली आहे. चांदी 1.18 टक्क्यांच्या घसरणीसह 55567 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार सुरु आहे. 


याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात सोन-चांदीच्या दरात घसरण झाली आहे . सोने स्पॉट किमतीत काल 0.21 टक्क्यांनी घसरण झाली आहे, तर चांदीची किंमत 1.70 टक्क्यांनी घसरली आहे. सोमवारी सोन्याचा भाव प्रति औंस डॉलर 1,640.35 वर गेला आहे. काल आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 1.20 टक्क्यांनी घसरून 18.56 डॉलर प्रति औंस झाली आहे.


सोने खरेदी करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा !


सोने खरेदी करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अ‍ॅप देखील वापरु शकता. 'बीआयएस केअर अ‍ॅप'द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अ‍ॅपद्वारे तक्रारही करू शकता.


तुमच्या शहराचे दर तपासा


तुम्ही तुमच्या घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुमचा मेसेज येईल.


 


महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील दर (Gold Price ) सोने दर 10 ग्रॅमचा (Price per 10 grams ) 
मुंबई Rs.48,070
पुणे Rs.48,070
नागपूर Rs.51,190
नाशिक Rs.48,070
ठाणे Rs.48,070
औरंगाबाद Rs.48,390
सोलापूर Rs.50,470
अमरावती Rs.50,470
नांदेड Rs.51,520
कोल्हापूर Rs.50,470
सांगली Rs.50,470
जळगाव Rs.50,470

पनवेल           Rs.50,470
सातारा Rs.48,070