Gold Price : सोने दरात दुसऱ्या दिवशी घसरण; चांदीही स्वस्त, पाहा आजचा दर
Gold, Silver Rate Update, 30 June 2021: सोने विकत घेण्याची ही उत्तम संधी आहे. कारण सोने वायदा बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
मुंबई : Gold, Silver Rate Update, 30 June 2021: सोने विकत घेण्याची ही उत्तम संधी आहे. कारण सोने वायदा बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोने प्रति तोळा (10 ग्रॅम) 47,000 रुपयांच्या खाली गेले आहे. मंगळवारी चांदीच्या किंमतीही 900 रुपयांपेक्षा जास्त घसरण पाहायला मिळाली आहे. सोने आता उच्च पातळीवरुन प्रति 10 ग्रॅम 9700 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
MCX Gold: मंगळवारी सोने वायद्यात मोठी घसरण दिसून आली, संपूर्ण दिवसात सोने वायद्याच्या घसरणीसह व्यापार सुरु होता. मात्र, सोने दरात घसरण पाहायला मिळाली. शेवटी सोने दर प्रति 10 ग्रॅम 400 रुपयांपेक्षा जास्त खाली आले आणि ते प्रति 10 ग्रॅम 46555 रुपयांवर बंद झाले. आजही सोने खरेदीत मंदी आहे. आज सोने दर 46500 रुपये आहे.
या आठवड्यात सोने दर (28 जून-2 जुलै)
दिवस सोने (MCX ऑगस्त वायदा)
सोमवार 47008/10 ग्रॅम
मंगळवार 46555/10 ग्रॅम
बुधवार 46500/10 ग्रॅम (ट्रेडिंग जारी)
गेल्या आठवड्यात सोने दर (21-25 जून)
दिवस सोने (MCX ऑगस्त वायदा)
सोमवार 47074/10 ग्रॅम
मंगळवार 47011/10 ग्रॅम
बुधवार 47072/10 ग्रॅम
गुरुवार 46870/10 ग्रॅम
शुक्रवार 46925/10 ग्रॅम
सोने उच्चांकी स्तरावरुन सुमारे 9700 रुपयांनी स्वस्त
मागील वर्षी, कोरोनाच्या संकटामुळे लोकांनी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. ऑगस्ट 2020 मध्ये, MCXवर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56191 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली. आज ऑगस्ट वायदा एमसीएक्सला सोने प्रति 10 ग्रॅम 46500 रुपयांच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही जवळपास 9700 रुपयांनी स्वस्त होत आहे.
MCX Silver: चांदीचा वायदा मंगळवारी 900 रुपये प्रति किलोच्या मोठ्या घसरणीसह बंद झाला. चांदीचा वायदा मात्र आज 260 रुपयांच्या मजबुतीसह व्यापार करीत आहे. चांदी किंमत 67500 रुपये प्रतिकिलोवर आहे.
गेल्या आठवड्यात चांदीचा दर
दिवस चांदी (MCX जुलै - वायदा)
सोमवार 68141/किलो
मंगळवार 67232/किलो
बुधवार 67500/किलो (ट्रेडिंग जारी)
मागील आठवड्यात चांदीचा दर
दिवस चांदी (MCX जुलै - वायदा)
सोमवार 67762/किलो
मंगळवार 67515/किलो
बुधवार 67932/किलो
गुरुवार 67733 /किलो
शुक्रवार 67873 /किलो
चांदी उच्चांकी दरावरुन 12500 रुपयांनी स्वस्त
चांदीची सर्वोच्च पातळी 79,980 रुपये प्रति किलो आहे. त्या अनुषंगाने चांदी देखील उच्च पातळीवरुन सुमारे 12500 रुपयांनी स्वस्त झाली आहे. आज चांदीचा जुलै वायदा प्रति किलो 67500 रुपये आहे.
सराफा बाजारात सोने
सराफा बाजारात जूनमध्ये सोने आतापर्यंत 2400 रुपयांनी स्वस्त झाले आहे. 1 जून रोजी सोन्याचा दर 10 ग्रॅम 49422 रुपये होता, काल हा दर 47008 रुपये होता. त्याचप्रमाणे चांदीही 1 जूनपासून प्रति किलो 5000 रुपयांनी स्वस्त झाली आहे.