Gold Price Today:  आज सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा तेजी आली आहे. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर सोनं किंचितसं वधारले आहेत. तर, चांदीच्या दरातदेखील 400 रुपयांची तेजी आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात थोडी सुस्ती दिसत आहे. बुधवारी सोन्याचे दर स्थिरावले होते. मात्र आज गुरुवारी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज MCX वर सोनं 110 रुपयांनी वधारलं आहे. तर चांदीच्या दरात 398 रुपयांची तेजी आली आहे. त्यामुळं आज प्रतिकिलोग्रॅम चांदी 91,100 रुपयांवर स्थिरावली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांची मागणी कमी असल्याने सोन्याचे दर स्थिरावले होते. या दरम्यान आज 99.9 टक्के शुद्धता असलेल्या मौल्यवान धातुंच्या किंमतीत 110 रुपयांची वाढ झाली असून आज सोनं 24 कॅरेट सोनं 77,890 रुपयांवर स्थिरावलं आहे. 


आज 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ झाली असून 71,400 रुपयांवर सोनं स्थिरावलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 80 रुपयांची वाढ झाली असून सोनं 58,420 रुपयांवर स्थिरावले आहे. सोन्याच्या दरात किंचितशी वाढ झाली असली तरी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 


आज काय आहेत सोन्याचे भाव?


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  71, 400 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  77, 880 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  58, 420 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,140 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,789 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 842 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   57,120 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   62,312 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    46,736 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट-71, 400 रुपये
24 कॅरेट- 77, 880 रुपये
18 कॅरेट- 58, 420 रुपये