Gold Price Today: सोने खरेदी करायचे आहे का? जाणून घ्या आजचा दर
Gold Price 24 February 2023 : अनेक जण जमीन आणि सोने यात गुंतवणूक करतात. जास्त करुन सोने खरेदी करण्याला काही लोक प्राधान्य देतात. मात्र, सोने दरात सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, सध्या सोने दर हा पन्नाशीच्या पुढे गेला आहे. आज मध्य प्रदेशच्या सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
Gold Price Update 24 February 2023: तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. (Gold Price) मुंबईत सोन्याच्या किमती इतर सर्वत्र चढ-उतार होतात, पण त्यामुळे सोने यामधील गुंतवणुकीचा पर्याय म्हणून विचार करण्यापासून कोणीही थांबत नाही. सोने खरेदीला प्राधान्य आजही दिले जात आहे. सध्या सोने (Gold) दर स्थिर आहेत. (Gold Price Today)
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या माहितीनुसार परदेशातील मौल्यवान धातूंच्या दरात झालेल्या घसरणीमुळे गुरुवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव 305 ₹ रुपयांनी घसरुन प्रति 10 ग्रॅमचा 56,035 रुपये आहे. मागील काही दिवसात सोने 56,340 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावले होते. तर गेल्या दोन दिवसांपासून मध्य प्रदेशातील सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
त्याचबरोबर चांदीच्या दरातही घट झाली आहे. आज म्हणजेच शुक्रवार, 24 फेब्रुवारी रोजी सराफा बाजारातील सोने-चांदीची किंमत ( Gold-Silver Price Today) जाणून घ्या. दिल्लीच्या बाजारात सोने किमत प्रति 10 ग्रॅम 305 रुपयांनी खाली आल्या होत्या. दिल्लीत सोन्याचा भाव 56,035 रुपये आहे. तर या तुलनेत मुंबईत (Today 24 Carat Gold Price per gram in Mumbai (INR) 24 Carat Gold 56410 रुपये तर 22 Carat Gold 53260 रुपये असा दर आहे. त्यामुळे मुंबईत सोने स्वस्त आहे.
सोने भाव स्थिर ( Gold Price Today)
Bank Bazaar.com नुसार, मध्य प्रदेशच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच, जे सोने काल गुरुवारी ( 22 Carat Gold) 22 कॅरेट सोने 52,930 रुपये प्रति 10 ग्रॅम होते, ते आज त्याच किंमतीला विकले जाईल. दुसरीकडे, जर आपण 24 कॅरेट सोन्याबद्दल (24 Carat Gold) बोलायचे झाले तर, काल जे सोने 55,580 रुपये प्रति 10 ग्रॅम होते, ते आज त्याच दराने विकले जाईल. गेल्या दोन दिवसांपासून मध्य प्रदेशच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव स्थिर आहे.
चांदीच्या किमतीत घसरण ( Silver Price Today)
जर आपण चांदीबद्दल सांगायचे झाले तर आज चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. मध्य प्रदेशच्या सराफा बाजारात गुरुवारी 72,000 रुपये प्रति किलो चांदीची विक्री झाली. आज 71,500 रुपये किलो दराने विकली जाईल. म्हणजेच एकूणच चांदीच्या दरात किलोमागे 500 रुपयांची घट झाली आहे.
जाणून घ्या सोने-चांदीची किंमत कशी ठरते?
भारतातील सोने -चांदीची किंमत फ्युचर्स मार्केट ट्रेडिंगनुसार ठरवली जाते. ट्रेडिंग दिवसाचा शेवटचा बंद हा पुढील दिवसाचा बाजारभाव मानला जातो. मात्र, हे सेंट्रल प्राइज आहे. यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये इतर काही शुल्कासह दर निश्चित केला जातो आणि त्यानंतर किरकोळ विक्रेता दागिन्यांमध्ये मेकिंग चार्ज लावून त्याची विक्री करतो.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक
24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आहे आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध असले तरी ते अतिशय लवचिक आणि कमकुवत आहे. या कारणास्तव त्यापासून दागिने बनवता येत नाहीत.