Gold Price Today On 12 July: जून महिन्यात स्वस्त झालेल्या सोन्याने जुलै महिन्यात उसळी घेतली आहे. गेल्या काहि दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. कमोडिटी बाजारात या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी आल्याचे चित्र आहे. तर, आंतरराष्ट्रीय बाजारातही सोनं चकाकले आहे. काल आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत तेजी आल्यानंतर एका झटक्यातच डॉलरचा भाव वाढला होता. मात्र, त्या तुलनेने भारतात सोन्याच्या भावात किंचितशी वाढ होत आहे. आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांची वाढ झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 330 रुपयांची वाढ झाली आहे. आज सोन्याचे भाव 73,750 रुपयांवर स्थिर झाले आहेत. तर, काल सोन्याचे दर 73,420 रुपयांवर स्थिर होते. सकाळी MCX वर सोन्याचे दर वधारले आहेत. 22 कॅरेट सोन्याच्या दरातही 300 रुपयांची वाढ झाली आहे. आज 22 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम 67,600 रुपये इतके आहे. 


सोन्याच्या दरात वाढ का?


अमेरिकेत महागाईचा दर गेल्या 12 महिन्याच्या निच्चांकी पातळीवर आला आहे. गुरुवारी समोर आलेल्या डेटानंतर सप्टेंबरमध्ये दरात कपात होण्याची 90 टक्के शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1 टक्क्यांनी उसळलं आहे. 22 मेनंतर पुन्हा एकदा सोनं 2,400 डॉलरच्या जवळपास पोहोचले आहे. 1.8 टक्के तेजी आल्यानंतर सोनं 2,414 डॉलर प्रति औंसवर पोहोचले. गोल्ड फ्युचर 1.6 टक्क्यांनी वाढलं आणि 2,418 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहे. 


असा आहे सोन्याचे दर


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट   67, 600 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट   73,750 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   55,310 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6,760 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,375 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5,531  रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   54, 080 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   59, 000  रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    44, 248  रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट-  67, 600 रुपये
24 कॅरेट-  73,750 रुपये
18 कॅरेट- 55,310 रुपये