Gold Price Today: सणासुदीच्या दिवसांत सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळं शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोनं 550 रुपयांनी महागलं होतं. आता एक तोळं सोन्याचे किंमत 79,900 म्हणजेच जवळपास 80 हजारांवर पोहोचले आहे. अखिल भारतीय सराफा संघाकडून ही माहिती देण्यात आले आहे. चांदीच्या किंमतीत जवळपास 1 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारच्या सत्रात 99.9 टक्के शुद्धतेचे सोनं 79,350 रुपये प्रतितोळा पोहोचले होते. तर सलग तिसऱ्या दिवशी 99.5 टक्के शुद्धतेचे सोन्यात तेजी पाहायला मिळाली आहे. आज 24 कॅरेट सोनं 440 रुपयांनी वधारलं असून 79,420 रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदी 1 हजार रुपयांनी वाढून 94,500 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.  सोन्याने आजवरचा उच्चांकी दर गाठला आहे. 


बाजार विशेषतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना खरेदीदारीत तेजी पाहायला मिळत आहे. याचमुळं वायदे बाजारात दागिन्यांची मागणी वाढली आहे. तर, दुसरीकडे पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या तणाव आणि अगामी निवडणुकांमुळं अनिश्चित्ततामुळं गुंतवणुकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे कल आहे. त्यामुळं सोन्याच्या दरात वाढ होत आहे. 


आज काय आहेत सोन्याचे भाव?


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  72,800 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  79,420रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  59,570 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,280 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 942 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 957 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   58,240 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   63,536 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    59,570 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट- 72,800 रुपये
24 कॅरेट-  79,420रुपये
18 कॅरेट- 59,570 रुपये