Gold Price Today: सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे. आज सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांना किंचितसा दिलासा मिळालेला आहे. मात्र तरीही सोन्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. आज सोन्याच्या दरात 160 रुपयांची घट झाल्याने 24 कॅरेटसाठी प्रति तोळा सोन्याचा दर 74,840 रुपये इतका आहे. त्याचबरोबर, चांदीच्या दरातही तेजी आली आहे. चांदीचे दर MCXवर  380 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळं आज चांदीचे दर 92,322 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. चांदी मागील व्यवहारात 91,942 रुपयांवर स्थिरावली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारात सप्टेंबरमध्ये यूएसमध्ये रेट कमी झाल्याने सोन्याच्या मागणीत वाढ झाली होती. त्यामुळं सोन्याच्या किंमतीदेखील उसळल्या होत्या. स्पॉट गोल्ड 0.1 टक्क्याने वाढून 2,461 डॉलर प्रति औंस इतकी होती. बुधवारी सोनं 2,483 डॉलरच्या ऑल टाइम उच्चांकी दरावर होते. तेच यूएस गोल्ड फ्युचर 0.2 टक्क्यांनी वाढून 2,465 डॉलरवर पोहोचले आहे. व्याज दरात कपात आणि यूएसमधील निवडणुका यामुळं सोनं 2,500 डॉलरवर पोहोचू शकतात, अशी शक्यता आहे. 


आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ होत असताना स्थानिक बाजारातही सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे. मंगळवारी सोनं 550 रुपयांनी वाढून 75,700 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके होते. गुडरिटर्नसच्या माहितीनुसार, आज सोन्याच्या दरात 160 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोनं 74,840 रुपयांवर पोहोचले आहे. तर, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 150 रुपयांची घट झाली असून सोनं आज 68,600 रुपयांवर पोहोचले आहे. 


असा आहे सोन्याचे दर


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट   68, 600 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट   74,840 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   56,130 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6,860 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,484 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5,613  रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   54, 880रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   59, 872  रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    44,904  रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट-  68, 600 रुपये
24 कॅरेट-  74, 840 रुपये
18 कॅरेट- 56, 130 रुपये