सोन्याच्या दरात आज पुन्हा झाली घट; काय आहेत 22,24,18 कॅरेटचे भाव, जाणून घ्या
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
Gold-Silver Price Today: कमोडिटी बाजारात पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात सुस्ती आली आहे. अमेरिकेत व्याज दरात घट होण्याची शक्यता असल्याने ट्रेडर्स आधीच सतर्क झाले आहेत. त्यामुळं बुधवारी वायदे बाजारात ट्रेंडिग कमजोर असल्याचे पाहायला मिळतेय. त्याचाच परिणाम सोन्या-चांदीच्या दरात होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 2,660 पर्यंत घसरले आहे. MCX वर सोनं आज 77 हजारापर्यंत पोहोचलं आहे.
आज रात्री फेडरल बँकेच्या व्याज दराबाबत निर्णय होणार आहे. दरात 0.25 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लग्नाचा सीझन असल्याने मागणी वाढली आहे. मात्र असे असूनही आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. आत 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची घसरण झाली प्रतितोळा सोनं 77,840 रुपयांवर पोहोचले आहे.
आज 22 कॅरेट सोनं 150 रुपयांनी घट झाली आहे त्यामुळं प्रतितोळा सोनं 71,350 रुपयांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोनं 120 रुपयांनी स्वस्त झालं असून प्रतितोळा सोन्याची किंमत 58,380 रुपये इतकी आहे. सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 71,350 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 77,840 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 58,380 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,135 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7,784 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 838 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 57,080 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 62,272 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 46,704 रुपये
मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 71,350 रुपये
24 कॅरेट 77,840 रुपये
18 कॅरेट- 58,380 रुपये