दागिने खरेदीची उत्तम संधी; सोनं आज 500 रुपयांनी स्वस्त; 24 कॅरेटचा भाव वाचा
Gold Price Today In Marathi: सोन्याच्या दरात आज मोठी घट होत आहे. काय आहेत सोन्याचा आजचा भाव
Gold Price Today In Marathi: सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत आहे. या आठवड्यात कमोडिटी बाजारात सोन्याच्या दरात तेजी दिसून आली होती. मात्र, शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घट झाल्यानंतर आता त्याचा परिणाम वायदे बाजारातदेखील दिसू लागला आहे. वायदे बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घट झाली आहे. ग्लोबल मार्केटमध्ये सोनं 40 डॉलरने कोसळून 2,450 डॉलरवर स्थिर झाले होते. तर, चांदीदेखील 1 टक्क्याने घसरून 30 डॉलरच्या जवळपास पोहोचली होती.
शुक्रवारी सोनं आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूमध्ये मोठी घट झाली आहे. MCXवर सोनं 490 रुपयांनी कमी झालं असून 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 74,350 रुपयांवर स्थिर झाले आहे. तर, 22 कॅरेट सोनं 450 रुपयांनी घसरले आहे. त्यामुळं 10 ग्रॅम सोनं प्रतितोळा 68,150 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, आज चांदी 1,155 रुपयांनी घसरुन 90,617 रुपयांवर ट्रेड करत आहे. तर, काल चांदी 91,772 रुपयांवर स्थिरावली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात सप्टेंबरमध्ये दरात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतरही सोन्याच्या दरात घट होऊ शकते. यूएस स्पॉट गोल्ड 0.21% घसरून $2,453 प्रति औंस झाला. बुधवारी ते $2,483 च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. US सोने फ्युचर्स 0.1% घसरून $2.457 वर आले.
असा आहे सोन्याचे दर
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 68, 150 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 74,350 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 55,760 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 6,815 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7,435 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5,576 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 54, 520रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 59, 480 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 44,608 रुपये
मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 68, 150 रुपये
24 कॅरेट- 74,350 रुपये
18 कॅरेट- 55,760 रुपये