Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आता पुन्हा एकदा वाढ झआली आहे. डॉलर इंडेक्समध्ये तेजी आल्याने मौल्यवान धातुच्या किंमतीत वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोनं 25 डॉलरने वाढून 2650 डॉलरपर्यंत पोहोचले आहे. तर, चांदी 1 टक्क्याने घसरून 31 डॉलरवर पोहोचली आहे. आज गुरुवारीदेखील वायदे बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. MCXवरही सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज गुरुवारी 24 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं सोन्याच्या दर प्रतितोळा 77.950 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. लग्नसराईचे दिवस असताना सोनं स्वस्त झालं होतं. मात्र आता पुन्हा एकदा सोन्याचे भाव वधारले आहेत. त्यामुळं ग्राहकही चिंतेत पडले आहेत. 


आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 300 रुपयांची घसरण झाली आहेच. त्यामुळं प्रतितोळा सोनं 71,450 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर, 24 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांची घट झाली असून सोनं प्रतितोळा 77,950 रुपयांवर स्थिरावलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 240 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा सोनं 58,460 रुपयांवर पोहोचलं आहे.


आज काय आहेत सोन्याचे भाव?


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  71, 450 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  77, 950 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  58, 460 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,145 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 795 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 846 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   57,160 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   62,360 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    58,460 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट- 71,450 रुपये
24 कॅरेट- 77,950 रुपये
18 कॅरेट- 58,460 रुपये