Gold Price Today On 27th June: दागिने खरेदीचीला लाभ आता ग्राहकांना घेता येणार आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या दोन आठवड्यापासून सोन निच्चांकी स्तरावर पोहोचले आहे. भारतीय वायदे बाजारातील विक्रमी उच्चांकावरून सोन्याच्या किमती जवळपास 4,000 रुपयांनी घसरले आहे. गुरुवारी (27 जून), एमसीएक्सवर सोने 270 रुपयांनी घसरले आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी 71,730 रुपये इतके आहे. तर एकीकडे चांदीदेखील 385 रुपयांनी घसरून 86850 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. काल चांदी 86,965 रुपयांवर स्थिर झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मे महिन्यात सोन्याच्या दर 75,000 हजारांपार गेले होते. मात्र आता जून महिन्यात सोनं जवळपास 4 हजारांपर्यंत खाली घसरले आहे. तर, चांदीने देखील 96,000 हजारांचा टप्पा मेमध्ये पार केला होता. त्यातही जवळपास 10,000 रुपयांची घसरण झाली आहे. चीनने सोने खरेदीवर घातलेली बंदी आणि मागणीत घट यामुळे सोन्याच्या दरावर परिणाम झालेला आहे. 


आंतरराष्ट्रीय बाजारात, डॉलरच्या मजबूतीमुळे आणि रोखे उत्पन्नात वाढ झाल्यामुळे काल सोन्याच्या दरात १% घसरण झाली होती. या आठवड्यात अमेरिकेत महागाईचे आकडे येणार आहेत. ज्यावर गुंतवणुकांची नजर असणार आहे. स्पॉट गोल्ड 0.8 टक्क्यांनी घसरून 2,301 डॉलरवर पोहोचला होता. 10 जूननंतरचा हा निच्चांकी स्तर आहे. यूएस गोल्ड फ्युचरमध्ये 0.8 टक्क्यांपर्यंतची घसरण झाली असून प्रति औंस $ 2,313 वर पोहोचले आहे. 


ग्रॅम              सोनं           किंमत


10 ग्रॅम     22 कॅरेट   65, 750 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट   71, 730 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   53,800 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत


1 ग्रॅम     22 कॅरेट   6,575 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,173 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5,380  रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत


8 ग्रॅम     22 कॅरेट   52, 600 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   57, 384  रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    43, 040  रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट-  65, 750  रुपये
24 कॅरेट-  71, 730 रुपये
18 कॅरेट-  53, 800 रुपये