Gold Rate Today: सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. घरगुती बाजारात सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आजपासून नवरात्रौत्सवास सुरुवात झाली आहे. आजचा पहिला दिवस असताच सोन्याच्या दरात आज वाढ झाली आहे. आज ऑक्टोबर 3 रोजी सोन्याचे भाव काय आहेत जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 2,655.03 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता. याआधी, २६ सप्टेंबर रोजी $२,६८५.४२ पर्यंतचा विक्रमी उच्चांक गाठला होता. US सोने फ्युचर्स 0.2% वाढून $2,675.40 वर होते. मध्यपूर्व आशियातील वाढते तणाव याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर सातत्याने पाहायला मिळत आहे. आज 24 कॅरेट सोनं प्रतिग्रॅम 7,110 रुपयांवर पोहोचले आहे. तर एकीकडे चांदी 94,900 रुपये प्रतिकिलोवर स्थिरावली आहे. 


आज 3 ऑक्टोबर 2024 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे दर 77000 रुपयांवर स्थिरावले आहेत. 24 कॅरेट सोनं हे अधिक शुद्धतेचे असल्याचे मानले जाते. तर, आज 24 कॅरेट सोन्याचे भाव 110 रुपयांनी वाढले असून 77,560 रुपयांवर स्थिरावले आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याचे भाव 100 रुपयांनी वाढून 71,100 रुपयांवर स्थिरावले आहेत. 18 कॅरेट सोन्याचे भाव 80 रुपयांनी वाढून 58,170 रुपयांवर स्थिरावले आहेत. 


आज काय आहेत सोन्याचे भाव?


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  71,100 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  77,560 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  58,170 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,110 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 756 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 817 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   56,880 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   62, 048 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    46, 536 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट- 71,100 रुपये
24 कॅरेट- 77,560 रुपये
18 कॅरेट- 58,170 रुपये