Gold Price Today: कमोडिटी बाजारात आज थोडी नरमाई पाहायला मिळत आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर डॉलर इंडेक्स आणि बॉन्ड यील्डमध्ये मोठी उसळी घेतली आहे. यात बुलियन्सच्या किंमतीत घट झाली आहे. वायदे बाजारात सोनं आज स्वस्त झालं आहे. तर चांदीच्या दरातही आज घट झाली आहे. चांदीच्या दरात आज 573 रुपयांची घसरण झाली आहे. आज चांदी 90,247 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळं आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. अमेरिकेतील निवडणुकांमुळं डॉलर इंडेक्समध्येही मजबूत झाली आहे. तसंच, सोन्याच्या किंमतीत चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळतेय. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1790 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं आज प्रतितोळा सोनं 78,560 रुपयांवर स्थिरावले आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1650 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 72,000 रुपयांवर पोहोचले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात आज 1350 रुपयांची घसरण झाली असून आज प्रतितोळा सोनं 58,910 रुपयांवर स्थिरावलं आहे. 


आता लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात होणार आहे. त्याआधीच आज सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज दागिने खरेदीची सुवर्णसंधी ग्राहकांसाठी ठरणार आहे. 


आज काय आहेत सोन्याचे भाव?


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  72,000 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  78,560 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  58,910 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,200 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 856 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 891 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   57,600 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   62,848 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    47,128 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट- 72,000 रुपये
24 कॅरेट- 78,560 रुपये
18 कॅरेट- 58,910 रुपये