बजेट 2018: सोनं खरेदी करताय तर थांबा !
सध्या 31 हजाराच्या पार गेलेलं सोनं अर्थसंकल्पानंतर स्वस्त होण्याची शक्यता आहे.
मुंबई : सध्या 31 हजाराच्या पार गेलेलं सोनं अर्थसंकल्पानंतर स्वस्त होण्याची शक्यता आहे.
अर्थमंत्री अरूण जेटली 1 फेब्रवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये सोन्यावरील आयात शुल्क कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोनं 600 ते 1200 रूपयांनी स्वस्त होऊ शकतं.
अर्थसंकल्पात अरूण जेटली याबाबतचा निर्णय घेऊ शकतात अशी दाट शक्यता इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने वर्तवली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबण्याची गरज आहे.