गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर खरेदी करा दागिने, आज सोनं झालं स्वस्त, 24 कॅरेटचा भाव पाहून ग्राहकांना दिलासा
Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत होती. मात्र आज सोनं स्वस्त झालं आहे.
Gold Price Today: दागिने खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज गुरुपुष्यामृत योग आहे. हा योग साधूनच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहुर्तावर सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळं आज सराफा दुकानांत खरेदीदारांची झुंबड उडू शकते.
गेल्या काहि दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं महागल्याने ग्राहक हिरमुसले होत. मात्र, आज गुरुपुष्यामृताचा योग साधत सोनं किंचित स्वस्त झालं आहे. त्यामुळं आजचा दिवस हा सोनं खरेदीसाठी चांगला आहे. आज सोने खरेदीचा शुभ मुहूर्त असल्याने मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली जाते.
गुडरिटर्ननच्या आकडेवारीनुसार, आज 24 कॅरेट सोन्याचे दर 600 रुपयांनी घसरलं आहे. त्यामुळं आज प्रतितोळा सोनं 79,470 रुपयांवर स्थिरावलं आहे. 22 कॅरेट सोनं 72,850 रुपयांवर स्थिरावलं असून आज 550 रुपयांची घट झाली आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात आज 450 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं आज 59,610 रुपयांवर सोनं पोहोचलं आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 72,850 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 79,470 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 59,610 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,285 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 947 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 961 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 58,280 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 63,576 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 59,610 रुपये
मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 72,850 रुपये
24 कॅरेट- 79,470 रुपये
18 कॅरेट- 59,610 रुपये