मुंबई :  भारतातील मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा भाव 1100 रुपये प्रति तोळेने वधारला आहे. तर चांदी 2500 रुपये प्रति किलोने वधारली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशिया - युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजाराच्या अर्थकारणाला फटका बसला आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये इंधन आणि सोन्याचे भाव वाढले आहेत


युद्धाचा परिणाम भारतावरही दिसून येत आहे. त्यामुळे सोन्याचे भाव 1100 रुपये प्रतितोळेने वाढून 51800 रुपयांच्या पुढे गेले आहे. तर चांदी देखील 2500 रुपयांनी वाढून 68400 रुपये प्रति किलोवर पोहचले आहे.


कच्च्या तेलाचा भडका


युक्रेन-रशियातल्या संघर्षानं कच्च्या तेलाचे भाव कडाडले आहेत. भारत आयात करत असलेल्या ब्रेंट कच्च्या तेलाचे दर 107 डॉलर्सच्या वर गेलेत. अमेरिका आणि आशियाई शेअर बाजारावरही युद्धामुळे मंदीचं सावट कायम आहे. भारतीय शेअर बाजारावरही याचे विपरीत परिणाम अपेक्षित आहे..