Gold :  दिवाळी आणि धनत्रयोदशी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळीत (Diwali 2022 ) सोने, सोन्याचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते. जर तुम्ही सोन्याचे (Gold Price) दागिने खरेदी करत असाल तर सावधगिरी बाळगा कारण आपली एखादी छोटीशी चूक तुमचे मोठे आर्थिक नुकसान करु शकते. सोन्याचे दागिने खरेदी करताना आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. त्या कोणत्या गोष्टी असल्यापाहिजेत याबद्दल जाणून घ्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोन्याचे नाणे किंवा दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्या शहरातील सोन्याच्या किंमती सर्वप्रथम जाणून घ्या. यामध्ये 24 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या किमतीत साधारणपणे 25% फरक असतो. उदाहरणार्थ, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर 15 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,440 रुपये प्रति 10 ग्रॅम होती, तर 18 कॅरेट सोन्याची किंमत 37,829 रुपये होती. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी शुद्धतेची खात्री करण्यासारख्या मूलभूत गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.​​​​​​


धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा


1. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) च्या हॉलमार्कसह नेहमी प्रमाणित सोने खरेदी करा. शुद्धता कोड, चाचणी केंद्र चिन्ह, ज्वेलर्स चिन्ह आणि चिन्हांकित तारीख देखील तपासा.


2. सोने खरेदी करताना रोख पेमेंट ही मोठी चूक ठरू शकते. UPI (जसे BHIM अॅप) आणि डिजिटल बँकिंगद्वारे पैसे भरणे चांगले आहे. तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट (debit and credit card) कार्डद्वारेही पैसे देऊ शकता. त्यानंतर बिल जमा करायला विसरू नका. ऑनलाइन ऑर्डर करत असल्यास, पॅकेजिंग तपासण्याचे सुनिश्चित करा.


4. फसवणूक टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नेहमी विश्वासू ज्वेलरकडून सोने खरेदी करणे. असे ज्वेलर्स करासारख्या वैधानिक गरजांचे योग्य प्रकारे पालन करतात. त्यांनी चूक केली तर ब्रँड व्हॅल्यू घसरण्याची त्यांना चिंता वाटते.


5. अनेक लोक सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहतात. अशा परिस्थितीत, तुमच्याकडे सोन्याच्या पुनर्विक्री मूल्याची संपूर्ण माहिती असणे महत्त्वाचे आहे. तसेच, संबंधित ज्वेलर्सच्या बायबॅक धोरणाबाबत स्टोअरच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करा.


सोन्याचे दागिने खरेदी करताना मेकिंग किंवा मेकिंग चार्जेस लक्षात ठेवा. मशीन तयार दागिन्यांचा मेकिंग चार्ज 3-25% आहे. शुद्ध सोन्याच्या नाण्यांवर सर्वात कमी मेकिंग शुल्क असते.


वाचा : सोन्यात गुंतवणुकीचा विचार करताय, मग ही बातमी वाचाच!


तुम्ही डिजिटल गोल्डमध्येही गुंतवणूक करू शकता


धनत्रयोदशीला पेमेंट अ‌ॅप्सद्वारे गोल्ड एक्स्चेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ), सार्वभौम सुवर्ण रोखे, गोल्ड म्युच्युअल फंड आणि डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करता येते. मात्र, डिजिटल सोन्यात कोणत्याही प्रकारे गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे.