मुंबई : सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. सोनं तसं अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे सोन्याचं दर (Gold Rate) किती ही असले तरी अनेक जण सोनं खरेदी करतातच. पण सर्वसामान्य माणूस मात्र भाव कमी होण्याची प्रतिक्षा करत असतो. लग्नसराईचे दिवस देखील जवळ आले आहेत. त्यामुळे लग्नात अनेक जण सोन्याचे दागिने घेत असतात. अशा लोकांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. (gold price may down)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑगस्ट-2020 मध्ये सोन्याचा दर 56000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत गेला होता. पण त्यानंतर सोन्याचा भाव (Gold rate Down) कमी होत गेला. जागतिक मंदीमुळे सोन्याचे भाव घसरत असल्याचं बोललं जात आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान भारतात सोन्याचा खप गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे एक चतुर्थांश कमी होऊ शकतो. असं देखील तज्ज्ञांचं मत आहे. सणासुदीच्या काळात सोन्याच्या विक्रीत वाढ झाली असली तरी अपेक्षित विक्री होऊ शकलेली नाही.


Gold खरेदीत भारत दुसऱ्या स्थानावर


जगातील सर्वाधिक सोनं खरेदी करणाऱ्यांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. तर चीन पहिल्या स्थानावर आहे. सोन्याची मागणी घसरल्याने त्याच्या किमती परिणाम होत असतो. परिणाम सोन्याचे भाव कमी होऊ शकतात.


Gold Rate: वर्षभरात 6000 रुपयांची घसरण


इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, 01 नोव्हेंबर रोजी सराफा बाजारात सोन्याचा भाव (Today gold rate) 50,460 रुपये झाला आहे. जो गेल्या महिन्याच्या सुरुवातीला 52 हजारांवर होता. ऑगस्ट-2020 मध्ये सोन्याचा दर 56000 रुपयांची विक्रमी पातळीवर पोहोचला होता.


महागाई दरात वाढ होत आहे. सप्टेंबरमध्ये भारताचा वार्षिक चलनवाढीचा दर ७ टक्क्यांच्या वर होता. भारतात सोन्याची सर्वाधिक विक्री ही ग्रामीण भागातून होते. पण सोन्याची मागणी कमी झाल्याने भाव वाढ होण्याची शक्यता कमी आहे. भारताचा एकूण सोन्याचा वापर 2022 मध्ये सुमारे 750 टनांपर्यंत पोहोचू शकतो, जो गेल्या वर्षी 343.9 टन होता.