Gold Rate today | सोन्याच्या दरात आज मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी घसरण झाली आहे.
Gold Price Today 13th July 2022: सरकारने आयात शुल्कात वाढ करूनही सोन्या-चांदीचे दर सातत्याने घसरत आहेत. आठवडाभरापूर्वी सलग तीन दिवसांची तेजी पाहिल्यानंतर आता सोन्यचाच्या किंमतीत घसरण झाली आहे. सोन्याची किंमत आज 50656 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या इतकी आहे. एकेकाळी सोन्याच्या किंमतीने 56254 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका विक्रमी उच्चांक गाठला होता.
चांदी उच्चांकावरून 20120 रुपयांनी कमी
चांदीचा दर 55888 रुपयांच्या पातळीवरून एकावेळी 76008 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला होता. म्हणजेच उच्चांकीवरून चांदीची 20120 रुपयांची घसरण झाली आहे. बुधवारी सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे भाव वधारले तर चांदी घसरली.
बुधवारी इंडिया बुलियन असोसिएशनने (https://ibjarates.com) जारी केलेल्या दरानुसार, सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 212 रुपयांनी घसरून 50656 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचप्रमाणे चांदीचा भाव 209 रुपयांनी घसरून 55888 रुपये किलो झाला.
MCX वर सोने आणि चांदीचे दर
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर बुधवारी दुपारी सोने आणि चांदीच्या किमतीत संमिश्र कल दिसून आला. दुपारी 2 वाजता सोने किरकोळ वाढून 50,530 रुपयांवर होते. त्याचवेळी चांदी 56,432 रुपयांच्या स्तरावर ट्रेड करीत होती.