नवी दिल्ली : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. लग्नसराईचा काळ सुरु झाल्याने सोनेखरेदी मोठ्या प्रमाणावर होतं आहे. त्यातच सोन्याच्या दरात घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पाहूयात सोन्याच्या दरात किती रुपयांनी घसरण झाली आहे.


सोनंच्या दरात घट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत कमी झाल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.


किती स्वस्त झालं सोनं?


आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची चमक फिकी पडली आहे आणि त्यासोबतच स्थानिक सराफांकडून होणारी मागणी कमी झाल्याने सोन्याच्या दरात घट झाली आहे. सोन्याच्या दरात ६० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमचा दर ३१,५५० रुपयांवर पोहोचला आहे.


चांदी चांगलीच चमकली


सोन्याच्या किंमतीत घट झाली असताना चांदीच्या दरात मात्र मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळालं. चांदीच्या दरात ५७५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर ३९,९७५ रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात लंडनमध्ये सोन्याच्या दरात घट होत डॉलर १,३२६ प्रति औंस झालं आहे.