Gold Rate In Maharashtra: सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. प्रतितोळा सोन्याचा दर 77 हजारांवर पोहोचला आहे. ऐन सणासुदीच्या काळात सोनं महागल्याने ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे. दसऱ्यापर्यंत सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दसऱ्यापर्यंत सोनं 78 हजारांचा गल्ला गाठू शकतात, अशी शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नाही, अशा पेचात ग्राहक पडले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात सोन्याला खूप जास्त महत्त्व आहे. सणासुदीच्या दिवसांत सोन्याचे महत्त्व अधिक असते. भारतात सोनं खरेदी करण्यामागे एक परंपरादेखील आहे. सणा-सुदीच्या दिवसांत तर आवर्जुन सोनं खरेदी केलं जातं. दसरा -दिवाळीतील धनतेरसला सोनं पुजलं जातं. काही जणं सोनं-चांदी यांकडे गुंतवणूक म्हणूनही पाहतात. एका वर्षांत सोन्याच्या भावात 25 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळं जर तुम्हाला गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करायचे आहे तर ही वेळ खरेदीसाठी योग्य आहे, असं तज्ज्ञांचे मत आहे. 


सोन्यात गुंतनणुकीतून चांगला परतावा मिळत असल्याने अनेक जण सोनं खरेदी करतात. तसंच, ही गुंतवणूक दीर्घकालीन असते. त्यामुळं अनेक जण ही गुंतवणूक सुरक्षित असल्याने यांकडे कल अधिक असतो. शुक्रवारी सोन्याचा दर हा 78 हजार प्रतितोळा इतका होता. तर, दसऱ्यापर्यंत सोनं कदाचित 78 ते 80 हजारांपर्यंत जाऊ शकते, असं सराफा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 


दरम्यान, अर्थसंकल्पा जाहीर झाल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घट झाली होती. सरकारने सोनं, चांदी आणि प्लॅटिनमवरील सीमा शुल्क (कस्टम ड्युटी) कमी केल्याने सोनं स्वस्त झाले होते. एकाच महिन्यात सोन्याचा भाव पाच हजारांनी कमी झाला होता. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय घडामोडी आणि फॅडरल बँकेतील व्याजदर कपातीची घोषणा यासारख्या अनेक कारणांमुळं पुन्हा एकदा सोन्याच्या दरात तेजी आली. जुलै महिन्यात सोनं सर्वाधिक स्वस्त होतं. जूनमध्ये सोनं 72,600 रुपये, जुलैमध्ये 68,000 रुपये तर ऑगस्ट महिन्यात सोनं 71,000 रुपये असा सोन्याचा भाव होता.