Gold and Sliver Rates Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढउतार (Gold Price Hike) होताना दिसते आहे. त्यामुळे सोन्याच्या दरांकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. येत्या काही दिवसांवरच होळीचा सण उत्साहात (Holi Festival) साजरा होणार आहे. तेव्हा होळीच्या या मंगलमय मुहूर्तावर सोन्याचे दरही महागण्याची चिंता आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी सोन्याचे दर ही उतरती कळा घेत होते परंतु त्यानंतर सोन्याचे भाव अचानक वाढल्याचे दिसते आहे. त्यातून आता मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये तरी सोन्याचे दर हे (Gold Rates in Mumbai) स्थिर आहेत. या मार्च महिन्याच्या मध्यांकापर्यंत सोन्याचे दर वाढू शकतात. त्यामुळे कदाचित यावेळी तुम्हाला थोडंसं थांबावं लागणार आहे. येत्या सिझननुसार, आजचे सोन्याचे दर काय असतील याकडे एक नजर टाकूयात या लेखातून. (gold rate price hikes in the coming reason of holi gold and sliver price may increase see the latest data business news marathi)


काय आहेत आजचे दर? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

10 ग्रॅम सोन्याच्या दरांची जर का पाहणी केली तर आज 22 कॅरेट (Standard Gold) सोनं हे 51,750 वर असून 24 कॅरेट (Pure Gold) सोनं हे 56,750 वर आहे. त्यामानानं 10 ग्रॅमच्या चांदीचे दर हे 665 रूपये आहे. कालच्या तारखेनुसार, 22 कॅरेट 1 ग्रॅम सोनं हे 30 रूपयांनी तर 8 ग्रॅम सोनं हे 240 रूपयांनी वाढले होते. त्याचसोबत 24 कॅरेट 1 ग्रॅम सोनं हे 31 रूपयांनी वाढलं होते आणि 8 ग्रॅम सोनं हे 248 रूपयांनी वाढले होते. मुंबईमध्ये 56,450 रुपये, पुणेमध्ये 56,450 रुपये, नागपूरमध्ये 56,450 रुपये तर महाराष्ट्राबाहेर लखनऊमध्ये 54,600 रुपये, कोलकत्तामध्ये 56,450 रुपये आणि दिल्लीमध्ये  56,600 रुपये इतके आहेत. 


2 मार्चनुसार, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Rates on MCX) सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. 58,000 वरील सोनं हे 55,763 वर पोहचले होते. त्यातून चांदी हे काल 375 रूपयांनी वाढले होते त्याचसोबत आज 665 नं वाढलं आहे. 


चांदीच्या दरांमध्ये कशी वाढ? 


मुंबईमध्ये चांदीचे रेट्स (Sliver Rates Today) 66,800 रूपये आहेत. कोलकत्तामध्ये हीच किंमत 67,000 एवढी आहे. दिल्लीमध्येही चांदीचे भाव हे 67,000 रूपये इतकी आहे. त्याचसोबत चेन्नईमध्ये 70,200 एवढी आहे.