नवी दिल्ली : जर आपण सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ही  तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण सोन्याच्या मागणीत घट झाल्याने सोमवारी साराफा मार्केटमध्ये सोने आणि चांदीची किंमत घसरली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोन्याचा भाव 75 रुपयांनी घटून 30,700 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांकडून कमी मागणीमुळेचांदीचा भाव 350 रुपयांनी घसरून 40,800 रुपये प्रति किलो झाला आहे.


राष्ट्रीय राजधानीत 99.9 आणि 99.5 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 75 रुपयांनी कमी झाला असून अनुक्रमे 30,700 आणि 30,750 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. शनिवारी सोन्याचा भाव 325 रुपयांनी वाढला होता.


चांदीच्या शिक्क्यांचा लिलाव 74,000 रुपये आणि विक्रीसाठी 75,000 रुपये प्रति सेकडा कायम राहिला.