मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत. सोन्याच्या भावात आज प्रति 10 ग्रॅम 320 रुपयांची वाढ झाली आहे. आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी जवळपास 46 हजार रूपये मोजावे लागत आहेत. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी जवळपास 47 हजार रूपये मोजावे लागत आहे. सोन्याच्या दरांत वाढ झाली असली तरी मागणी मात्र घटलेली नाही. सांगायचं झालं तर ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर 56 हजार 200 रूपयांवर पोहोचले होते. आता सोन्याचे दर 9 हजार रूपयांनी घसरले. त्यामुळे  ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाणून घ्या शहरांमधील सोन्याचे दर
शहर                22 कॅरेट                      24 कॅरेट 
मुंबई             46 हजार 750               47 हजार 750
चेन्नई             45 हजार 200               49 हजार 310
दिल्ली           46 हजार 550                50 हजार 550
कोलकाता      47 हजार 50                  49 हजार 750


जाणून घ्या शहरांमधील चांदीचे दर
शहर                       1 किलो
मुंबई                   69 हजार 600
चेन्नई                   74 हाजर 100
दिल्ली                 69 हजार 600
कोलकाता           69 हजार 600


या वर्षाच्या अखेरीस सोन्याचे दर 60 हजार रूपयांवर पोहोचतील असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. जर आपण सोन्याच्या गुंतवणूकीबद्दल बोललो तर गेल्या वर्षी सोन्याने 28 टक्के रिटर्न दिला आहे.