मुंबई : जागतिक बाजारांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये आज काहीशी घसरण नोंदवली गेली. त्याचा परिणाम म्हणून भारतीय बाजारांमध्येही सोन्याचे दर घसरले. सध्या भारतात लग्न सराईचा सिजन आटोपत आल्याने सोने चांदीच्या दागिन्यांची मागणी काहीशी कमी झाली आहे. स्थानिक सराफा बाजारांमध्येही सोन्याच्या दरांमध्ये घसरण नोंदवण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मल्टीकमोडिटी एक्स्चेंज (MCX)वर सोन्याची किंमत काहीशी घसरून 50860 रुपये प्रति 10 ग्रॅम वर ट्रेड करीत होती, तर चांदीची किंमत 61825 रुपये प्रति किलो वर ट्रेड करीत होते.


आज मुंबईतही सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. मुंबईत सोन्याचे दर 250 रुपयांनी घसरून 52,200 रुपये इतके झाले आहे तर, चांदीचे दर 500 रुपयांनी घसरून 62,400 रुपये इतके झाले आहे. 


मिस्ड कॉल देऊन सोन्या-चांदीची किंमती जाणून घ्या
किरकोळ बाजारात सोन्याच्या दागिन्यांचा दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊ शकता. यानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे दराची माहिती मिळेल.