मुंबई :  gold rate today :सोन्याचे दरांबाबत भारतीयांमध्ये नेहमीच कुतूहल असते. आंतरराष्ट्रीय घडामोडी, अर्थकारण, तसेच देशातील मागणी पुरवठ्याचा सोन्याच्या दरांवर परिणाम होत असतो. सोन्याच्या किंमतींमध्ये नेहमीच चढ उतार होत असतो. आज सोन्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरातील शेअर बाजारांमधील घसरण, रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाढता तणाव, युएस फेडरलच्या व्याजदरांमध्ये वाढ होण्याचे संकेतांच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती देखील कमी झाल्या आहेत. त्याचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून आला.


मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) आज सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसून आली. MCX वर सोन्याचे दर 48621 रुपये प्रति तोळे ट्रेड करीत होते. तर चांदीचे दर 63887 रुपयांवर ट्रेड करीत होते.


राज्यात लग्न सराईमुळे सोन्याची मागणी वाढली असून, सराफा बाजारात ग्राहकांची वर्दळ दिसून येत आहे. तरीही मुंबई, पुणे, जळगाव अशा सोन्याच्या मोठ्या बाजारपेठांमध्ये सोन्याचे दर घसरलेले दिसून आले. 


कालपेक्षा स्थानिक बाजारपेठांमध्ये सोन्याच्या दरांत तब्बल 1800 हून अधिक रुपये प्रति तोळेंची घसरण झाली. तर चांदीच्या दर देखील 500 रुपये प्रति किलोवरून घसरून 64,100 रुपये प्रति किलो इतके झाले होते.


प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर 
मुंबई 49,680 प्रति तोळे 
पुणे 49,900 प्रति तोळे
नागपूर 49,730 प्रति तोळे
नवी दिल्ली 50,000 प्रति तोळे


ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या दरांमध्ये वाढ होऊन 56 हजार प्रतितोळेंवर पोहचले होते. आज सोने 47 हजार 500 च्या आसपास ट्रेड करीत आहे.


त्यामुळे रेकॉर्ड हाय पेक्षा सोने स्वस्तच मिळत असल्याने सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल दिसून येत आहे.