नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात प्रत्येक दिवशी चढ-उतार होताना दिसत आहे.सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली तरी सोनं विकत घेण्यासासाठी जवळपास 45 हजार रूपये मोजावे लागत आहेत. शुक्रवारी चांदीच्या दरात 135 रूपयांची घसरण झाली असून प्रति किलोग्राम चांदीचे दर 66 हजार 704 रूपयांवर पोहोचले. शुक्रवारी सोन्याचे दर वाढले असून जवळपास प्रति ग्रामसाठी  45 हजार रूपये मोजावे लागत आहे. पूर्वीपेक्षा  सोन्याचे दर कमी झाल्यामुळे बाजारात सोन्यासाठी मागणी वाढली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीप्रमाणे, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सतत वाढ नोंदवण्यात येत होतीं. पण आज मात्र सोन्याच्या दरात घरसण झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी हिच संधी आहे. 


जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे आजचे दर 
शहर            22  कॅरेट                          24 कॅरेट 
मुंबई           44 हजार 240                   45 हजार 60
पुणे             44 हजार 60                     45 हजार 60
नवी दिल्ली   44 हजार 240                  45 हजार 60
चेन्नई           42 हजार 480                   46 हजार 340 
केरळ         44 हजार 250                    46 हजार 90