Gold rate today | सोन्यात तीव्र घसरण सुरूच; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
घटस्थापना आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर भारतात सोने खरेदीची परंपरा आहे. या सणांच्या दिवसांमध्ये सोन्याला मोठी मागणी असते.
मुंबई : घटस्थापना आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर भारतात सोने खरेदीची परंपरा आहे. या सणांच्या दिवसांमध्ये सोन्याला मोठी मागणी असते. तसेच आंतरराष्ट्रीय बाजाराच्या संमिश्र प्रतिसादामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून आले होते. या दिवसामध्ये सोन्याच्या दरात सलग काही वाढ होत होती. सणासुदीच्या दिवसांनंतर आता सोन्याच्या किंमतीत घट होत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे सणासुदीच्या काळात देशांतील महत्वाच्या सराफा बाजारपेठांमध्येही सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून आली. MCX मध्ये दुपारी 2.30 वाजता सोन्याचे दर 47 हजार 389 रुपये प्रति तोळ्यांवर ट्रेड करीत होते. तर चांदीमध्ये काहीशी वाढ होऊन 64 हजार 700 रुपये प्रति किलोच्या आसपास ट्रेड करीत होते.
दसऱा सणानंतर लगेचच सोन्याच्या किंमतीत घसरण नोंदवली गेली. अचानक सोन्याच्या दरांमध्ये घसरण झाल्याने रिटेल गुंतवणूकदारांनी सोने खरेदी करून गुंतवणूक सुरू केली आहे.
आजचे सोन्याचे दर
मुंबई 47,490 रुपये प्रतितोळे
चैन्नई 48,810 रुपये प्रतितोळे
कोलकता 49,600 रुपये प्रतितोळे
दिल्ली 50,840 रुपये प्रतितोळे
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या दरांमध्ये वाढ होऊन 56 हजार प्रतितोळेंवर पोहचले होते. आज सोने 47 हजार 500 च्या आसपास ट्रेड करीत आहे. त्यामुळे रेकॉर्ड हाय पेक्षा सोने स्वस्तच मिळत असल्याने सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल दिसून येत आहे.
------------
(वर दिलेले सोन्याचे दर कोणतेही कर वगळून देण्यात आले आहेत. स्थानिक बाजारपेठांनुसार यात बदल होऊ शकतो)