मुंबई: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीच्या दरात नागरिकांना दिलासा मिळाला नाही. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्या चांदीच्या दर स्थित आहेत. येत्या काळात हे दर घसरतील अशी अपेक्षा ग्राहकांना तर हे दर वाढतील अशी आशा सराफांना आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षभराच्या तुलने ऑक्टोबरपर्यंत तब्बल 10 हजार रुपयांनी सोन्याचे दर घसरले आहेत. दिल्लीच्या सराफ बाजारात 44,917 रुपये 10 ग्राम सोन्याची किंमत आहे. तर चांदीचे दर  57,425 रुपये प्रति तोळे आहे. दिल्लीच्या सराफ बाजारात शुक्रवारी सोन्याचे दर  555 रुपयांनी वधारले आहेत. 


चांदीच्या भावातही आज जोरदार वाढ झाली. दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी चांदीची किंमत 58 हजार रुपयांनी वाढून 975 रुपयांच्या वाढीसह 58,400 रुपये प्रति किलोवर बंद झाली. त्याचबरोबर, आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या किमतीत कोणतेही महत्त्वपूर्ण बदल झाले नाहीत आणि ते 22.16 डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे.


काय आहेत 24 ते 14 कॅरेट गोल्ड रेटचे दर


24 कॅरेट सोन्याचे दर- 46467
23 कॅरेट सोन्याचे दर- 46281
22 कॅरेट सोन्याचे दर- 42564
18 कॅरेट सोन्याचे दर- 34850
14 कॅरेट सोन्याचे दर- 27183