नवी दिल्ली : सोन्याच्या दरात घट झाल्यानंतर आता दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे आता सोनं खरेदी करणं ग्राहकांना महागात पडणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोन्याच्या दरात दिल्लीतील सराफ बाजारात वाढ झाल्याचं पहायला मिळालं. स्थानिक विकेत्यांच्या लिलावात वाढ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली वाढ यामुळे सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.


सोनं महागलं


दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या दरात २१० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचा दर ३१,९९० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.


चांदीही चमकली 


एकीकडे सोन्याच्या दरात वाढ झाली असताना चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरातही २१० रुपयांनी वाढ होत ४०,८७० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.


स्थानिक ज्वेलर्स आणि खरेदी करणाऱ्यांच्या मागणीमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंगापूरमध्ये सोन्याच्या दरात ०.१२ टक्क्यांनी घसरण होत ते १,२८८.७० डॉलर प्रति औंसवर पोहोचले.


राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेलं सोनं २१० रुपयांनी महागलं. त्यामुळे सोन्याचा दर क्रमश: ३१,९९० रुपये आणि ३१,८४० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.