मुंबई : सोन्यांच्या दरात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली आहे. या घसरणी मागील कारण आहे स्थानिक ज्वेलर्सकडून सोन्याची मागणी कमी झाली आहे. मंगळवारी देशातील राजधानी दिल्लीत सोन्याच्या दरात 100 रुपयांनी घसरण झाली असून 6 महिन्याच्या सर्वाधिक खालच्या स्तरावर गेली आहे. तर चांदीचा भाव हा 130 रुपये प्रती किलोने घटला असून गेल्या 3 महिन्यातील निच्चांक गाठला आहे. 


आजचा सोन्या - चांदीचा दर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजधानी सोने 99.9 आणि 99.5 टक्के शुद्ध असून त्यामध्ये 100-100 रुपयांची घट झाली आहे. 31,050 आणि 30,900 रुपये प्रति दर ग्रामवर आली आहे. गेल्या सोमवारी सोन्याचा दर 60 रुपये प्रति ग्रॅम कमी झालं आहे. आठ ग्रॅम गिन्नीचा दर हा 24,700 रुपयांवर कायम राहिला 


यामुळे आली घसरण 


सराफ बाजारानुसार स्थानीक आभूषण विक्रेत्यांकडून कमी मागणी असल्यामुळे सोन्या, चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. तर वैश्विक बाजारात किमती धातूच्या दरात घसरण पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर असा आहे. न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा दर 0.25 टक्के वाढून तो 1,243.18 डॉलर प्रति औस पोहोचले आहे. 


चांदी झाली स्वस्त 


चांदीचे दर 130 रुपयांनी कमी झाले असून आता 39,820 रुपये प्रति किलो आहे. साप्ताहिक घट ही 185 रुपये पाहायला मिळाली असून दर 39,980 रुपये झाला. चांदीच्या सिक्क्यांचा दर हा 74000 लिलाव आणि 75000 रुपये बिकलाव प्रति सेकडा होता.