Today Gold-Silver Price : दिवाळी (Diwali 2022) सणाला कालपासून सुरूवात झाली आहे. याचपार्श्वभूमीवर सोने खरेदीसाठी (Gold and Silver Price) लोकं सराफा बाजाराकडे वळत आहे. मात्र सोन्याचा भावात वाढ झालेली असल्याचे दिसत आहे. दरम्यान मागील आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावातही घसरण होताना दिसली, मात्र आता 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,000 रुपये आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव 


आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 47000 रूपये असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 46,250 रुपये प्रति 10 ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी 57,700 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 56,150 रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग (making charges) शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.


तर मुंबईमध्ये (Mumbai Gold Pricec) 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10  ग्रॅम 47000 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,280 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात (Pune Gold Price) प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,030 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,310 रुपये असेल. नागपूर (Nagpur Gold Price) मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,030 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,310 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये (Nashik Gold Price) 24 कॅरेट सोन्याचा दर 47,030 आहे तर प्रति 10  ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 51,310 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 577 रुपये आहे.


सोन्याची शुद्धता कशी तपासावी?


सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.


वाचा  : IND vs PAK सामन्याआधी वाईट बातमी,  फॅन्सच्या आनंदावर पडू शकतं विरजण   


24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.


22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.


21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.


18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.


14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिलेले असते.