बाप्पाच्या आगमनाआधीच सोनं महागलं, आज किती आहे 24 कॅरेटचे दर? वाचा
Gold Silver Price: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. गणेशोत्सवाच्या आधीच सोनं महागलं आहे.
Gold Silver Price: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा तेजी आल्याचे समोर येत आहे. कमोडिटी बाजारात आज पुन्हा सोन्याचे भाव वाढले आहेत. सराफा बाजारात सोन्याच्या दरात उसळी घेतली आहे. तर, चांदीही चकाकली आहे. वायदे बाजारात आज सोनं 550 रुपयांने वधारले आहे. आज बाजारात प्रतितोळा सोनं 73,310 रुपये इतके झाले आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर आज सोनं महागल्याने भाविकही चिंतेत पडले आहेत. चांदीच्या दरातही आज वाढ झाली आहे. आज चांदी 85,171 रुपयांवर पोहोचली आहे. काल चांदी 84,956 रुपयांवर स्थिरावली होती.
देशांतर्गत पातळीवर, व्यापाऱ्यांनी सोन्याच्या किमतीत वाढ होण्याचे श्रेय आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत ट्रेंडला दिले आहे. त्यामुळं त्याचा बाजारावर परिणाम झाला असून स्थानिक पातळीवरही खरेदी वाढली आहे. तसंच, भारतात सध्या गणेशोत्सवाची लगबग आहे. या दिवसांत बाप्पाच्या खरेदीबरोबरच सोन्याच्या दागिन्यांची मागणीदेखील वाढते. त्यामुळं सोन्याच्या किंमती वाढले आहेत. गुडरिटर्ननुसार, आज 22 कॅरेट सोनं आजज 510 रुपयांनी वाढलं आहे. तर, 18 कॅरेट सोन्याच्या किंमती 422 रुपयांनी वाढलं असून आज प्रतितोळा 54,982 रुपयांवर पोहोचले आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 67,200 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 73, 310 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 54, 982 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 6,720 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 331 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 498 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 53, 360 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 58, 216 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 43, 656 रुपये
मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 67,200 रुपये
24 कॅरेट-73, 310 रुपये
18 कॅरेट- 54, 982 रुपये