Gold Price :  सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुमचाही सोने खरेदी करण्याचा विचार असेल तर किंमतीमध्ये मोठा बदल झाला आहे. जागतिक बाजारात सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. 10 ग्रॅम सोने दर 22 कॅरेटसाठी 54,700 रुपये असून 24 कॅरेटचा दर 59,670 रुपये आहे. दरम्यान, आजपासून सहा अंकी हॉलमार्क क्रमांक नसेल तर सोन्याचे दागिने तुम्ही विकू शकणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार असेल तर अपडेट जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जागतिक बाजारात सोने-चांदीच्या दरात वाढ झाली असताना काल दिल्लीत सराफा बाजारात सोने भाव 59000 च्या पातळीवर बंद झाला. यासोबतच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली आहे. 


सोने-चांदीचे भाव पाहा


दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव 380 रुपयांनी वाढून 59,680 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला. त्याचवेळी, गेल्या सराफा बाजारात सोने 59,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. मात्र, चांदीचा भाव 280 रुपयांनी घसरुन तो  71,300 रुपये प्रति किलो झाला आहे. तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अ‍ॅप देखील वापरु शकता. 'बीआयएस केअर अ‍ॅप'द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अ‍ॅपद्वारे तक्रारही करु शकता.


तसेच आजपासून सहा अंकी हॉलमार्क क्रमांक नसेल तर सोन्याचे दागिने तुम्ही विकू शकणार नाही. एका अधिसूचनेनुसार, केंद्रीय मंत्रालयाने हॉलमार्किंग ऑफ गोल्ड ज्वेलरी आणि गोल्ड आर्टिफॅक्ट्स ऑर्डर, 2020 मध्ये सुधारणा केली आहे. या अंतर्गत ज्या ज्वेलर्सनी यापूर्वी त्यांच्या जुन्या हॉलमार्क केलेल्या दागिन्यांचा साठा जाहीर केला होता त्यांना त्यांची विक्री करण्यासाठी 30 जून 2023  पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर ते त्यांची विक्री करु शकणार नाहीत.


दिल्ली बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 380 रुपयांनी वाढून 59,680 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,975 डॉलर प्रति औंस झाला, तर चांदी 23.75 डॉलर प्रति औंस झाली, अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले. अमेरिकेत गेल्यावर्षी आर्थिक तेजी कमी असल्याने याचा परिमाणही सोने किमतीवर दिसून आला आहे.