Gold Rate Today: आज लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सोनं पूजलं जातं. तर आजच्या दिवशीही सोनं खरेदी करणे शुभं मानलं जातं. दिवाळीच्या दिवसांत सोन्याचे दर वाढत आहेत. धनत्रयोदशीलादेखील सोन्याचे दर वाढले होते. मात्र, आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली आहे. तुम्हीदेखील आज सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची संधी सोडू नका. आज सोन्याचे दर कमी झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लक्ष्मीपूजन हा शुभ दिवस मानला जातो. या दिवशी घरातील सोन्या-नाण्याची पूजा केली जाते. त्यामुळं आज तुम्हालादेखील सोनं खरेदीची उत्तम संधी आहे. आज सोन्याच्या दरात चांगलीच घट झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 770 रुपयांची घट झाली असून सोनं 80,560 रुपये प्रतितोळा इतकं झालं आहे. त्यामुळं आज तुम्ही दागिने खरेदी करु शकता. 


दिवाळीनंतरच लग्नसराईला सुरुवात होणार आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दागिन्यांना मागणी असते. भारतात सोनं खरेदीची परंपरा खूपवर्षांपासून चालत आली आहे. आज  22 कॅरेट सोन्याच्या दरात 700 रुपयांची घट झाली झाली असून 73,850 रुपये प्रतितोळा सोनं स्थिरावलं आहे. तर, 18 कॅरेट सोन्याच्या दरात 580 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 60,420 रुपयांवर पोहोचलं आहे. 


आज काय आहेत सोन्याचे भाव?


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  73,850 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  80,560 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  60,420 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,385 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   8, 056 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6, 042 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   59,080 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   64,448रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    48,336 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट-  73,850 रुपये
24 कॅरेट- 80,560 रुपये
18 कॅरेट- 60,420 रुपये