Gold Rate Today: बुधवारी वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. चांदीच्या दराने देखील उसळी घेतली आहे. सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. आज सकाळी MCXवर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळं ग्राहकांच्या चिंतेत पुन्हा एकदा भर पडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाळीनंतरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. मात्र, त्यानंतरच्या आठवड्यात सोनं पुन्हा एकदा वधारलं होतं. ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोनं वधारल्यानं ग्राहकांच्या चिंतेत भर पडली होती. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 270 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं 77,510 रुपयांवर सोनं पोहोचलं आहे. 


आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 250 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं सोन्याचे दर प्रतितोळा 71,050 रुपयांवर पोहोचलं आहे. त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याच्या दरात 270 रुपयांनी वधारलं असून  प्रतितोळा सोनं 77,510 रुपयांवर पोहोचलं आहे. आज 18 कॅरेट सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅम सोनं 58,130 रुपयांवर पोहोचलं आहे. 


आज काय आहेत सोन्याचे भाव?


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  71, 050 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  77, 510 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  58, 130 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,105 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,751 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 813 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   56,840 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   62,008 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    46,504 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट- 71, 050 रुपये
24 कॅरेट- 77, 510 रुपये
18 कॅरेट- 58, 130 रुपये