मुंबई : Gold, Silve Price : दोन दिवसांच्या वाढीनंतर सोन्याच्या दरात आज थोडी घसरण पाहायला मिळत आहे. MCX वर सोन्या, चांदीच्या दरात आज एक चतुर्थांस घसरण पाहायला मिळत आहे. याचा परिणाम सामान्यांवर होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

MCX Gold : सोमवारी १२०० रुपये आणि मंगळवारी ३०० रुपये सोन्याच्या दरात वाढ झाली. MCX च्या फेब्रुवारीच्या दोन दिवसांच्या करारामुळे १५०० रुपये प्रति १० ग्रॅम सोनं महागलं आहे. मात्र आज सोन्याच्या दरात जरा घट झाली आहे. सोन्याच्या दरात मंगळवारी ३११ रुपयांची वाढ झाली असून ५१,७२० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं. सोन्याच्या दराने मंगळवारी ५१,७८० रुपये इंट्रा डे मध्ये उंच्चाक गाठला तर ५१,३३३ हा निच्चांक होता. 


आज सोन्याच्या दरात घट पाहायला मिळत आहे. MCX वर सोन्याच्या फेब्रुवारीतील करारात १६० रुपये प्रति १० ग्रॅम सोन्याची घसरणीसोबत खुलं झालं. आता सोन्याचा दर ५१,५६० रुपये प्रति १० ग्रॅम ट्रेड करत आहे. 


१० ग्रॅम सोन्याचा भाव 


शहर         सोन्याचा भाव
दिल्ली          ५४,७००
मुंबई           ५१,३२०
कोलकाता       ५३,२६०
चेन्नई          ५२,९५०



१ किलो चांदीचा दर 


शहर            चांदीचा दर  
दिल्ली           ७०,२००
मुंबई            ७०,२००
कोलकाता        ७०,२००
चेन्नई           ७४,५००