Gold Price Today : सोने खरेदीदारांसाठी मोठी बातमी, 24 आणि 22 कॅरेटच्या किमतीत पुन्हा वाढ
Gold Silver Price : महागाईच्या काळात सर्वसामान्यांना आणखी एक झटका देणारी बातमी समोर आली आहे. कारण गेल्या दोन दिवसापासून सोन-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे.
Gold Silver Price on 6th April 2023 : देशात गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदी (Gold Silver Price) महागाईवर स्वार झाल्याचे पाहायला मिळत आहे. या दोन्ही मौल्यवान धातुच्या किंमतीत सातत्याने वाढत आहे. मध्यंतरी या दरात घसरण झाली होती पण तेजीचे सत्र आता कायम राहिल. सोन्याने सर्वात अगोदन फेब्रुवारी महिन्यात विक्रम केला होता. त्यानंतर सोन्याने काल (5 एप्रिल 2023) ला 60,000 रुपयांचा टप्पा पार केला आहे. आता सोने आणि चांदी पुन्हा 60,000 रुपयांच्या घरात गेल आहे. तर एक किलो चांदीचे दर 74,000 रुपये होता. अजून हा विक्रम तुटला असून आता चांदी 77,000 रुपायांवर आहे.
आजच्या अहवालानुसार गुरुवारी (6 एप्रिल) 24 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 60,780 रुपये आहे तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) 55,680 रुपये आहे. गेल्या 24 तासात 10 ग्रॅम (24 कॅरेट/22 कॅरेट) च्या किमती 1060 रुपयांनी वाढल्या आहेत. तर भारतातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत बदल नोंदवले आहेत. आज चेन्नईमध्ये 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 52,285 रुपये आहे. तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) 47,927 रुपये आहे. दरम्यान सोन्याचा भाव 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचवेळी चांदीचा भाव प्रतिकिलो 74 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 60,977 रुपये आहे. तर 999 शुद्धतेची चांदी 74522 रुपये आहे.
वाचा: तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल महागले की स्वस्त झाले? चेक करा लेटेस्ट दर
पाहा तुमच्या शहरातील दर
तर दुसरीकडे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा दर 61,510 रुपये आहे. तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) 56,400 रुपये आहे. कोलकातामध्ये 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा दर 61,360 रुपये आहे तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) 56,250 रुपये आहे. त्याचबरोबर मुंबईत (Mumbai Gold Price) 24 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) भाव 61,360 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) भाव 56,250 रुपये आहे. भुवनेश्वरप्रमाणेच आज 24 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 61,360 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत आज 56,250 रुपये आहे. गेल्या 24 तासात 10 ग्रॅम (24 कॅरेट/22 कॅरेट) च्या किमती 1030 रुपयांनी वाढल्या आहेत.
मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील.
अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या
आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.