मुंबई :  कमी मागणीमुळे सोन्या आणि चांदीच्या दरात फरक पाहायला मिळत आहे. लग्नसमारंभाचे दिवस कमी झाल्यामुळे आता सोन्या - चांदीची मागणी कमी झाली आहे. आणि याचा फरक आपल्याला सोन्या - चांदीच्या दरात पाहायला मिळत आहे. सोमवारी सराफा बाजारात सोन्याचे दर कोसळले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या दरात 20 रुपयांनी घट झाला असून आता सोन्याचा दर हा 31,400 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे. तसेच चांदीवर देखील फटका पडला आहे. चांदीचा दर 250 रुपयांनी कोसळला असून 40,350 रुपये प्रती किलोग्रॅम आहे. 


यामुळे सोन्या - चांदीच्या दरात कपात 


मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका मुद्रेचा भाव वैश्विक असल्यामुळे सोन्याच्या दरात थोडी कमी दिसत आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेतील मुद्रास्फितीच्या आकड्यांमुळे फेडरल रिझर्व्हमध्ये भविष्यात व्याजदरात वृद्धी होणार आहे. यामुळे आता डॉलरचा भाव मजबूत आहे. सिंगापुरमध्ये सोन्याचा दर 0.37 टक्क्यांनी कोसळला असून 1,247.80 डॉलर आहे तर चांदी 1.06  टक्के पडली असून 15.92 डॉलर आहे. तसेच स्थानिक दुकानांमध्ये सोन्या - चादींची मागणी कमी असल्यामुळे त्याचा देखील फटका बसला आहे. 


काय आहे आताचा दर 


दिल्लीत 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा दरात 20 रुपयांनी घट झाली असून आताचा दर हा  31,400 रुपये आहे तर 99.5 टक्के शुद्ध सोन्याचा दर हा 31,250 रुपये आहे. गेल्या 2 सत्रात 230 रुपयांनी घसरण पाहायला मिळाली होती. चांदीच्या दरात 250 रुपये घट झाली असून 40,350 प्रति किलोग्रॅम आहे.