मुंबई : Gold, Silver Rate Update: सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. आजही दोन्ही वायदा बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. MCXवर काल चांदी अडीच टक्क्यांहून घसरुन बाजार बंद झाला. तर सोने वायदा सुमारे दोन टक्क्यांनी घसरला. त्यामुळे सोने-चांदीच्या दरात घट दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोने प्रति 10 ग्रॅम 49,000 रुपयांच्या वर होते. काल अचानक यात घसरण झालेली पाहायला मिळाली. गुरुवारी सोने दरात घट झाल्यामुळे दर प्रति 10 ग्रॅम 48530 रुपयांपर्यंत खाली आला. सोने दर 924 रुपये खाली आला. आजही  सफारा बाजारात सुस्ती पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसात सोने 1000 रुपयांनी स्वस्त झाले आहे.


सराफा बाजारात पुन्हा किंमतींमध्ये घसरण 


Gold Rate Today: सराफा बाजारात पुन्हा एकदा किंमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोने  खरेदी स्वस्त झाली आहे. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 339 रुपयांनी घसरुन 48,530 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली आहे. सोने दर घसरणीमागील प्रमुख कारण म्हणजे परदेशी बाजारपेठेतील मंदी. याआधी, मागील व्यापार सत्रात सोने प्रति दहा ग्रॅम 48,869 रुपये होते. तसेच चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. चांदीची मागणीत घट झाली आहे. त्यामुळे कमी मागणीमुळे चांदीची किंमती खाली आली आहे. चांदीचा दर 475 रुपयांनी घसरून 70,772 रुपयांवर आला. गेल्या सत्रात चांदीची किंमत ,71,247 रुपये प्रति किलो होती.


एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल सांगतात की, जागतिक बाजारात सोने विक्रीमध्ये दबाव दिसून येत आहे. किंमती प्रति औंस 1900 डॉलरपर्यंत खाली आल्या आहेत. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात सोने दरावर झाला. दिल्ली सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 339 रुपयांनी घसरले.


सराफा बाजारात कमी मागणी 


सोने वायदा भावही कमजोर दिसत आहे. सराफा बाजारत कमी मागणी होत असल्याने सोने खरेदीवर परिणाम दिसून आला. एमसीएक्सवर सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 327 रुपयांनी घसरून 49,274 रुपयांवर आला. कमी मागणीमुळे सोने खरेदीही कमी झाली आहे. ज्याचा परिणाम दरावर झाला. एमसीएक्सवर ऑगस्ट डिलीव्हरी वायदा भाव  12,352 लॉटच्या व्यापार उलाढालीवर 0.66 टक्क्यांनी घट झाली.